भारत विकास परिषद व संपर्क फाऊंडेशनद्वारा सॅनिटायझेशन चेंबर कार्यान्वित

जळगाव प्रतिनिधी । येथील भारत विकास परिषद व संपर्क फाऊंडेशन यांच्या तर्फे महापालिकेच्या प्रवेश द्वारावर सॅनिटायझेशन चेंबर कार्यान्वित करण्यात आले.

संपर्क फाऊंडेशन ही स्वयंसेवी परावलंबी आजारी रुग्णाला घरी जाऊन ना नफा ना तोटा तत्वावधानावर काम करणारी संस्था.दररोज २२-२५ रुग्णांना घरी सेवा देते. कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी लॉक डाउन आणि सोशल डिस्टनसिंग सोबतच सॅनिटायजेशनची गरज आहे. म्हणूनच महापालिका प्रवेशद्वारावर सॅनिटायजेशन चेंबर कार्यान्वित करण्यात आले. याप्रसंगी महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, महापौर सौ भारती सोनवणे, उपमहापौर अश्‍विन सोनवणे ,नगरसेवक पिंटू काळे, कैलास सोनवणे,अतुलसिंह हाडा यांची उपस्थिती होती.

संपर्क फौंडेशन चे चेयरमन पुरुषोत्तम न्याती, भारत विकास परिषद देवगिरी प्रांत अध्यक्ष तुषार तोतला , भारत विकास परिषद जळगाव शाखा अध्यक्ष मांडे, सचिव विशाल चोरडिया ह्यांच्या सह चेतन दहाड, संतोष इंगळे, उमेश पाटील, रवींद्र लढ्ढा, उज्वल चौधरी, राजीव नारखेडे, डॉ. सुरेश अग्रवाल या सदस्यांची उपस्थिती होती.

Protected Content