विना मास्क फिरणार्‍यांवर कारवाईचा बडगा

रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील ग्रामीण भागात विना मास्क अथवा रुमाल न बांधलेल्या दहा जणांविरूध्द आज कारवाई करण्यात आली आहे.

प्रशासनाने लॉकडाउनचे पालन करण्याच्या वारंवार सूचना करून देखिल ग्रामीण भागात सूचनेचे पालन करत नसल्याने आज विना मास्क तसेच रुमाल न बांधलेल्या विरुध्द कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये सुरेश पाटील, सुधीर पाटील, प्रवीण पाटील, बबलू महाजन यांच्या वर मास्क न लावण्याने तहसिलदार उषाराणी देवगुणे यांनी कारवाई केली. तर संजय कोत्रे,संतोष महाजन,शेख कलीम,दिपक नाईक,शांताराम महाजन,नवाज तडवी या सर्वांवर प्रत्येकी ५०० रुपये दंड प्रमाणे निवासी नायब तहसिलदार संजय तायडे यांनी कारवाई केली. यावेळी त्यांच्या सोबत मंडळ अधिकारी सचिन पाटील, तलाठी दादाराव कांबळे यांची देखील उपस्थिती होती. यावेळी नेहता व खिरवड गावांमधील धान्य दुकानात मोफत धान्य वाटप करताना पात्र कार्डरकांना बरोबर धान्य मिळते की नाही याची निवासी नायब तहसिलदार यांनी खातरजमा केली.

Protected Content