दहिगावच्या ‘त्या’ क्लिनरच्या संपर्कातील १७ जणांना क्वारंटाइन – डॉ. हेमंत बऱ्हाटे

यावल प्रतिनिधी । कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर शहरातील ३५१ तर ग्रामीण भागातील ४ हजार ९३० अशा ५ हजार २८१ नागरिकांना सोमवारपर्यंत होम क्वारंटाइन करण्यात आल्याची माहीती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत बऱ्हाटे यांनी सोमवारी सायंकाळी येथील ग्रामीण रुग्णालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. सुदैवाने आपल्या यावल तालुक्यात अद्याप एकही रुग्ण पॉझेटीव्ह नसल्याचे सांगून त्यांनी दिलासा व्यक्त केला आहे.

सोमवारी सांयकाळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत बऱ्हाटे व ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.बी.बी. तडवी यांनी यावरच्या ग्रामीण रुग्णालयात संयुक्तरीत्या पत्रकारांशी बोलतांना सांगीतले की, पुणे, मुंबईसह बाहेरून आलेल्या नागरीकांची आरोग्य तपासणी केली आहे. त्यात शहरातील ३५१ नागरिकांना तर तालुक्यातील ग्रामीण भागतून सुमारे ४ हजार ९३० जनांना होम कोरंटाईन करण्यात आले आहे. अशाप्रकारे तालुक्यात कुठेही कोणतीही व्यक्तींमध्ये कोरोना संसर्गजन्य संदर्भातील लक्षणे आढळल्यास तात्काळ ग्रामीण रुग्णालयात अथवा ग्रामीण क्षेत्रातील प्राथमीक आरोग्य केंद्राशी तात्काळ संपर्क करण्याच्या सुचनाही दिल्याचे वैद्यकिय अधिकारी यांनी सांगितले आहे. होम क्वारंटाइन असलेल्या रुग्णांवर ग्रामीण पातळीवर पोलीस पाटील, आशावर्कर तर शहरी भागात आरोग्यसेविका लक्ष ठेवत असल्याचेही त्यांनी सांगीतले.

दहीगाव गावात १७ जणांना होम कोरंटाईन
दोन दिवसापूर्वी आंध्र प्रदेशातून तालुक्यातील दहीगाव येथे कांदे भरण्यासाठी आलेला ट्रक चालक हा कोरोना संसर्गजन्य रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्या चालकाच्या संपर्कात आलेल्या २२ मजुरांना जळगाव येथे तपासणीसाठी नेले असता त्यातील पाच जनांना आपल्या घरी तर उर्वरीत १७ जनांना जळगाव येथे होम कोरंटाईन करण्यात आल्याचेही डॉ. हेमंत बऱ्‍हाटे यांनी सांगून अद्याप त्या मजुरांचा कोणताही अहवाल प्राप्त नसल्याचे सांगून येत्या एक-दोन दिवसात त्यांचे तपासणी अहवाल येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Protected Content