कोरोना लसिकरणाची शेंदूर्णीत रंगीत तालीम

 

शेंदूर्णी प्रतिनिधी । येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात ड्रायरन कोरोना-१९ लसीकरणाची रंगीत तालीम जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भीमाशंकर जमादार यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ.समाधान वाघ यांच्या नियंत्रणाखाली, तालुका वैद्यकीय अधिकारी राजेश सोनवणे यांच्या सहकार्याने व वैद्यकीय अधिकारी डॉ.राहुल निकम यांच्या नियोजनात पार पडली.

यावेळी सर्व  पत्रकार बंधू ,सर्व वैद्यकीय अधिकारी,सर्व आरोग्य कर्मचारी,तसेच आशा कर्मचारी यांच्या सर्वांच्या उपस्थित Covid 19 vaccination Dry Runकरोना लसिकरण – रंगित तालिम –  कार्यक्रम प्राथमिक आरोग्य केंद्र,शेंदुर्णी येथे वेगवेगळ्या पाच टप्प्या नुसार संपन्न झाला.

१)निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना फिजिकल डिस्टंसिन्गमध्ये उभे करण्यात आले.श्रीमती मंजुळा जावळे यांनी त्याचे नियोजन केले.कर्मचाऱ्यांचे हात सॅनिटाइज व त्यांना मास्क देऊन श्री.ईश्र्वर कोळी यांनी टप्याटप्याने आत सोडण्यात आले.या सर्व गोष्टींचे निरीक्षण डॉ.शुभम सावळे यांनी केले. 

२) प्रतिक्षालयात नोंदणी नुसार आरोग्य सेवक श्री. अनुरथ रहाडे व आरोग्य सेविका श्रीमती.मालती फडणवीस यांनी कर्मचाऱ्यांचे तापमान व ऑक्सिजन चेक केले. गतप्रवर्तक श्रीमती.सविता कुमावत यांनी नोंदणी नुसार कर्मचाऱ्यांचे आधारकार्ड चेक केले.आणि फार्मसिस्ट श्री. डीगंबर मुर्तुडकर यांनी कोविन ॲपमध्ये कर्मचाऱ्यांची माहिती भरून घेण्यात आली.आणि त्यांना क्रमांक देऊन लसीकरणासाठी टप्याटप्याने नेण्यात येत होते.या सगळ्या गोष्टींचे निरीक्षण वैद्यकीय अधिकारी डॉ.सागर पाटील यांनी केले.

३) लसीकरणाच्या ठिकाणी लसीकरणाची तयारी आरोग्य सेविका श्रीमती. अल्का लोणे यांनी केली. ज्याप्रमाणे अन्य लसी नियमित दिल्या जातात तशी लस टोचण्याचे प्रात्यक्षिक आरोग्य सहायिका श्रीमती.राजश्री पाटील यांनी केले.तसेच लसी बद्दल माहिती देण्यात आली.प्रात्यक्षिकानंतर कर्मचाऱ्यांना विचारणा करण्यात आली.तसेच चार महत्वाचे संदेश व पुढील लस म्हणजेच दुसरी लस कधी देणार याची दिनांक व वेळ या बद्दल माहिती आरोग्य सहाय्यक श्री.गजानन माळी,आरोग्य सेविका श्रीमती.शोभा घाटे यांनी देऊन निरक्षण कक्षात पाठवण्यात आले.या सर्व गोष्टींचे निरीक्षण वैद्यकीय अधिकारी डॉ.राहुल निकम यांनी केले.

४)निरीक्षण कक्षात कर्मचाऱ्यांचे निरीक्षण आरोग्य सेवक श्री.शैलेंद्र थोरात व आरोग्य सेविका श्रीमती. छाया देशमुख यांनी केले. लस दिल्यानंतर काही त्रास होतोय का?याची विचारणा दर दहा – पंधरा मिनिटांनी डॉ.आदित्य पाटील व डॉ.श्रद्धा पाटील यांच्या निरीक्षणाखाली केली जात होती.

५) अर्ध्या तासानंतर कर्मचाऱ्यांना बाहेर पाठविण्यात आले.यावेळी त्रंबक तवर यांनी ही प्रक्रिया पार पाडली.

 

 

 

Protected Content