‘एकल कलाकार अर्थसहाय्य अनुदान योजनेचा लाभ घ्या’ – कलाकारांना आवाहन

यावल प्रतिनिधी | ‘एकल कलाकार अर्थसहाय्य अनुदान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कलाकारांनी अर्ज करावेत’ असं जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांनी आवाहन केलं आहे.

सद्याच्या परिस्थितीला व दोन वर्षापासून संपूर्ण राज्यात कोरोनाने वातावरण ढवळून निघाले असून कोरोना संसर्गाचा प्रार्दूभाव वाढला आहे. कोरोना संकटकाळात संचारबंदीमुळे अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी आली असल्याने अशा कलाकारांना अर्थसहाय्य करण्यासाठी ‘एकल कलाकार अनुदान योजना सुरू केली असून या योजनेचा लाभ मिळवण्याकरीता अर्ज पंचायत समितीत द्यावे’ असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ . अभिजीत राऊत यांनी केले आहे .

ही कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सांस्कृतिक व कला क्षेत्रात कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील कलाकारांसाठी राज्य शासनाने एकल कलाकार एकरकमी अर्थ सहाय्य योजना सुरू असून याकरिता तालुक्यातील विविध क्षेत्रातील कलाकारांनी यावल पंचायत समितीच्या माध्यमातून अर्थसहाय्य योजनेचे अर्ज प्राप्त करावेत. आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून या समितीचे तालुका पातळीवरील अध्यक्ष तहसीलदार महेश पवार, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड, समितीचे सचिव सहाय्यक गटविकास अधिकारी किशोर सपकाळे यांच्याकडे छाननी समितीकडे द्यावे. तालुक्यातील कोरोना संकट काळात आर्थिक संकटात ओढवलेल्या कलाकारांनी या योजनेचा अर्थसहाय्य लाभ मिळवण्यासाठी अर्ज करावेत” असं आवाहन एकल कलाकार निवड समितीचे अध्यक्ष डॉ. अभिजीत राऊत यांनी केलं आहे .

Protected Content