उद्यापासून साकळी येथे उर्स सोहळा

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील साकळी येथील पंचक्रोशीतील पीर बाबा हजरत सजनशाह वली(रहे.) यांच्या ऎतिहासिक उर्स सोहळ्यास उद्या दि.०९ जानेवारीपासून सुरुवात होत आहे. 

हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या या उर्स सोहळ्यास शेकडो वर्षाची परंपरा आहे.या दिवशी सालाबाद प्रमाणे यावर्षी ही बाबांच्या संदल काढली जाणार आहे.मात्र यावर्षी कोरोना संकट पाहता मिरवणूक तसेच वाजे,डीजे यांना परवानगी नाकारली आली  संदल निमित्त जिल्ह्यातुन नव्हे तर जिल्ह्याबाहेरुन तसेच महाराष्ट्राबाहेरुन हजारो भाविक भक्त बाबांच्या दर्ग्याच्या दर्शनाठी येतात. 

हिंदू- मुस्लिम ऐकतेचे प्रतिक-हा उर्स गावाचा सांस्कृतिक व धार्मिक वारसा असून ऐकतेचे प्रतिक आहे.प्राचीन काळी डांभूर्णी ता.यावल येथील राजपूत परिवारातील महिला राजवंतीबाईस  हजरत सजनशाह वली(रहे.) बाबांनी बहिण मानून राखी बांधून घेतली व राखीची भेट म्हणून जमिनी दिल्या. तेव्हा पासून वंश परंपरेने या महिलेच्या परिवारातुन आजही एकादशीला संदल निमित्त सर्वप्रथम बाबांच्या पवित्र मझ़ार वर चादर चढविली जाते. 

ऐतिहासिक दर्गा – हजरत सजनशाह वली(रहे.) यांचे नाव शाह अ.लतीफ (रहे.) असे आहे. ख्याजा अजमेरी यांच्या सहकाऱ्यांमध्ये गणना होते.बाबा शेकडो वर्षापुवीं साकळी येथे आले. त्यांचा दर्गा ऐतिहासिक आहे. दर्गा चारही बाजूंनी पाहिल्यावर सारखाच दिसतो.दर्गा अतिशय कलाकुसरतेने बांधलेला असून लाकडाचा दरवाजा आहे.

१८१ वर्षाची सैय्यद परिवाराची परंपरा-साकळी ता.यावल येथील हजरत सजनशाह वली(रहे.) यांच्या ऐतिहासिक उर्साला शेकडो वर्षाची परंपरा आहे आणि हि परंपरा अखंडीत राखण्यासाठी तसेच कोरोना विषाणू च्या पाश्वभूमीवर साध्या पद्धतीने बाबांचा संदल काढला जाणार असल्याचे ठरले आहे असे सै अरमान मुजावर यांनी सांगितले.

हिंदू- मुस्लिम ऐकतेचे प्रतिक-हा उर्स गावाचा सांस्कृतिक व धार्मिक भाग असून गावाची परंपरा जपून तसेच कोरोना विषाणू  लक्षात घेता सोशल डिसटन्ट पाळून संदल काढावी व नियम पाळावे कोणालाही त्रास होणार नाही याचे भान ठेवावे असे यावल पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी दर्ग्याला भेट प्रसंगी मुजावर व नागरिकांशी सवांद करतांना म्हणाले .

 

 

Protected Content