लॉकडाऊन कालावधीत राज्यात आजवर ५० हजार गुन्हे दाखल

मुंबई प्रतिनिधी । सध्या सुरू असणार्‍या राज्यात आजवर कलम १८८ नुसार सुमारे ५० हजार गुन्हे दाखल झाले आहेत, तर १० हजार व्यक्तींना अटक करण्यात आली असून ३२ हजार वाहने जप्त करण्यात आली असल्याची माहिती पोलीस विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

पोलीस विभागातर्फे जारी करण्यात आलेल्या प्रसिध्दी पत्रकात नमूद करण्यात आले आहे की, सध्या सुरू असणार्‍या राज्यात आजवर कलम १८८ नुसार ४९,७५६ गुन्हे दाखल झाले आहेत तर १०,२७६ व्यक्तींना अटक करण्यात आली असून ३२,४२४ वाहने जप्त करण्यात आली असल्याची माहिती पोलीस विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. उपरोक्त कालावधीत राज्यभरात पोलीस विभागाच्या १०० नंबर वर ७०, ३०७ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वॉरंटाईन असा शिक्का आहे, अशा ५५५ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवले. या काळात अवैध वाहतूक करणार्‍या १०४४ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. परदेशी नागरिकांकडून व्हिसा उलंघनचे १५ गुन्हे राज्याभरात नोंदवले आहेत. तर या कालावधीत झालेल्या विविध गुन्ह्यांसाठी १,८२,७६,७४४ (१ कोटी ८२ लाख ७६ हजार ७४४) रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न सुरू असून पोलीस अधिकारी कर्मचारी देखील २४ तास कार्यरत आहेत. या संकटाशी मुकाबला करताना दुर्देवाने सात पोलीस अधिकारी व २३ पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या कालावधीत पोलिसांवर हल्ला होण्याच्या १०२ घटनांची नोंद झाली असून यात १६२ आरोपींना अटक करण्यात आली असल्याचेही या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content