यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील एका गावातून अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याची घटना घडली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भातील माहिती अशी की, यावल तालुक्यातीत एका गावातील सत्तरा वर्षापेक्षा कमी वय असलेली मुलगी दिनांक २१ जानेवारी २०२३ शनिवार रोजी सकाळी ५ .३० वाजेच्या सुमारास आपल्या घरातुन शौचालयास जाते असे बोलुन गेली पण ती अर्धा तासापेक्षा अधिक वेळानंतर देखील शौचालय वरून परत आली नाही म्हणुन तिच्या कुटुंब्यांनी गावाच्या परिसरात व नंतर ईतर ठीकाणी नातेवाईकांकडे शोधाशोध घेतला. तरी देखील ती मिळुन आली नाही.
दरम्यान, अखेरीस त्या अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांनी यावल पोलीस स्टेशन गाठले व अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादी वरुन भादंवी कलम३६३ प्रमाणे अज्ञात व्याक्ती विरूद्ध अल्पवयीन मुलीला फुस लावुन पळवुन नेल्याची गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानमावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोनाकॉ राजेन्द्र सुकदेव पवार हे करीत आहेत.