
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील विठ्ठल मंदीर महाजन वाडा परिसरातून एकाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शुक्रवारी २१ जुलै रोजी सकाळी १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, कल्पेश लहू कोल्हे (वय-३५) रा. विठ्ठल मंदीर चौक, जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. २० जुलै ते २१ जुलै दरम्यान त्यांच्या घरासमोर दुचाकी क्रमांक (एकएच १५ डीजी ६१५६) ही घरासमोर पार्कींगला लावलेली असतांना अज्ञात चोरट्याने मध्यरात्री चोरून नेली. हा प्रकार घडल्यानंतर कल्पेश कोल्हे याने दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर शुक्रवार २१ जुलै रोजी सकाळी १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विकास सातदिवे करीत आहे.



