दगडाने मारहाण करून प्रौढाचा खून; एकाला अटक

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  तीन महिन्यांपुर्वी मारहाण करत डोक्यात दगड टाकून एकाचा खून केल्याप्रकरणी एकाला अमळनेर पोलीसांनी अटक केली असून अमळने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दगडू नारायण पाटील (वय-४५) रा. नगरपालिका समोर अमळनेर असे मयताचे नाव असून नरेंद्र उर्फ भटू यशवंत चौधरी रा. माळीवाडा, अमळनेर असे अटकेतील संशयित आरोपीचे नाव आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, दगडू नारायण पाटील हा अमळनेर शहरातील रूपाली साई हॉटेल येथे कामाला होता. २२ एप्रिल रोजी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास शहरातील सुजान मंगल कार्यालयाजवळून दगडू पाटील हा जात असतांना संशयित आरोपी नरेंद्र यशवंत चौधरी याने त्याला चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर लोखंडीवस्तूने डोक्यात टाकून गंभीर जखमी केले. त्यानंतर दगडावर पडल्याने जखमी झाल्याचा बनाव केला. तशी पोलीसात माहिती दिली. दरम्यान, मयताच्या नातेवाईकांनी संशयास्पद मृत्यूची झाल्याचे पोलीसांना सांगितले. त्यानंतर पोलीसांनी चौकशी अंती संशयित आरोपी नरेंद्र चौधरी याने मारहाण करून त्यांचा खून केल्याचे निष्पन्न झाले. अखेर पोलीसांनी संशयित आरोपी नरेंद्र चौधरी याला अटक केली. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले करीतआहे.

Protected Content