जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील शिवकॉलनी स्टॉप परिसरातील एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याची एटीएमकार्ड अदलाबदली करुन एकाने ९५ हजार रुपये परस्पर काढून घेत परस्पर घेत फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बुधवार, २१ सप्टेंबर रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
जळगाव शहरातील गणेश कॉलनी परिसरातील श्रीहरी नगर येथे शेतकरी संजय पंडीतराव पाटील वय ५१ हे राहतात. ते १३ सप्टेंबर रोजी जळगाव शहरातील शिवकॉलनी परिसरातील एटीएम येथे पैसे काढण्यासाठी गेले होते, यादरम्यान पैसे काढत असतांना एकाने बोलण्यात गुंतवून संजय पाटील यांच्याकडील एटीएमकार्डची अदलाबदली केली. तसेच या एटीएमच्या आधाराने त्याने संजय पाटील यांच्या खात्यावरुन ९५ हजार ७५० रुपये परस्पर काढून घेतले व फसवणूक केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी बुधवार, २१ सप्टेंबर रोजी जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल फिरोज तडवी हे करीत आहेत.