आठवडे बाजार परिसरातून तरुणाची दुचाकी लांबविली

भुसावळ- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |शहरातील आठवडे बाजार परिसरातून एका तरुणाची ३० हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २५ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता घडली आहे. याप्रकरणी चौकशी अंती अखेर रविवारी ५ मे रोजी मध्यरात्री १ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मोहम्मद इसाक देशमुख वय-३५, रा. मित्तल नगर, खडका रोड भुसावळ हा तरुण वास्तव्याला आहे. त्याची दुचाकी (एमएच 19 सीसी 4427) ने २५ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता तो भुसावळ शहरातील आठवडे बाजार परिसरात आलेला होता. त्यावेळी त्याने त्याची दुचाकी याच परिसरात पार्किंगला लावलेली होती. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्याची ३० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेली. ही घटना घडल्यानंतर मोहम्मद देशमुख यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला, परंतु काहीही माहिती मिळाली नाही. अखेर रविवारी ५ मे रोजी मध्यरात्री १ वाजता त्यांनी दिलेला फिर्यादीवरून भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल महेश चौधरी हे करीत आहे.

Protected Content