शेतातून बैलगाडीसह बैलजोडी व म्हैस यांची चोरीचा प्रयत्न; एकावर गुन्हा दाखल

धरणगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील निमखेडा शिवारातील शेत गट क्रमांक ४५ येथून म्हैस, बैलगाडी आणि दोन बैल यांची चोरी करत असताना एकाला रंगेहात पकडले आहे. ही घटना शनिवारी ४ मे रोजी रात्री ९ वाजता उघडकीला आला आहे. याप्रकरणी रविवारी ५ मे रोजी दुपारी २ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ईश्वर पांडुरंग चौधरी वय-५१, रा. झुरखेडा ता. धरणगाव हे आपलं परिवारासह वास्तव्याला असून शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे निमखेडा शिवारातील शेत गट क्रमांक ४५ येथे त्यांचे शेत आहे. या शेतात त्यांनी बैलगाडीला बैलजोडी आणि एक म्हैस बांधलेली होती. दरम्यान शनिवारी ४ मे रोजी रात्री ९ वाजता शेतकरी ईश्वर चौधरी हे गुरांना चारा पाणी करण्यासाठी शेतात गेले. त्यावेळी शेतात असलेल्या बैलजोडी, बैलगाडी व म्हैस यांची चोरीच्या उद्देशाने आलेला सुक्राम मांगा सोनवणे रा. दुसखेडा ता. धरणगाव हा आढळून आला. त्यावर त्याला विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. दरम्यान शेतकरी ईश्वर चौधरी यांनी दुसऱ्या दिवशी रविवारी ५ मे रोजी दुपारी २ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी सुक्राम मंगा सोनवणे यांच्या विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक जितेंद्र भदाने हे करीत आहे.

Protected Content