भाजीपाला विक्रेत्याची १३ लाखात फसवणूक

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील एमआयडीसी परिसरातील गजानन येथील भाजीपाला विक्रेत्याची एकाने १३ लाखांत ऑनलाईन फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी बुधवार, २१ सप्टेंबर रोजी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील गजानन नगर येथे संतोष बन्सीला जैसवाल वय ४६ हे भाजीपाला विक्रेते राहतात. जळगाव शहरातील हॉटेल रामा इनच्या मागील बाजूस राहत असलेल्या प्रितेश प्रकाश लोढा याने तो भाजीपाला विक्रीचा मोठा व्यापारी असल्याचे सांगत संतोष बन्सीलाल यांचा विश्वास संपादन केला. तसेच ठोक भावात भाजीपाला खरेदी करुन तो चांगल्या भावात विक्री करु. अशी बतावणी केली. तसेच या कारणासाठी प्रितेश याने वेळावेळी रोख तसेच आरटीजीसएने संतोष जैसवाल यांच्याकडून दि. १४ फेब्रुवारी २०२२ ते ११ मार्च २०२२ दरम्यान १३ लाख रुपये घेतले.

अनेकदा मागणी करुनही ते पैसे प्रितेश लोढा परत करत नसल्याने आपली फसवणूक झाली अशी खात्री झाल्यावर संतोष जैसवाल यांनी याबाबत बुधवार, २१ सप्टेंबर रोजी शहर पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन प्रितेश लोढा याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रवींद्र सोनार हे करीत आहेत.

Protected Content