चक्कर येवून पडल्याने शिरसोली येथील तरूणाचा मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । सेक्यूरीटी गार्ड म्हणून कामावर असतांना चक्कर येवून पडल्याने शिरसोली येथील २९ वर्षीय तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सचिन राजू आस्वार (बारी) (वय-२९) रा. शिरसोली प्र.बो. ता.जि.जळगाव हा तरूण जैन कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून कामाला आहे. रविवारी दुपारी २ ते १० दरम्यान कामावर असतांना सायंकाळी ७.४५ वाजेच्या सुमारास सचिनला चक्कर आल्याने तो जमीनीवर पडला.

सोबतच्या सहकाऱ्यांना जैन कंपनीच्या रूग्णवाहिकेतून शहरातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री १० वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान सचिनचा मृत्यू झाला. जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात मृतदेह आणण्यात आला. आज सकाळी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रविण पाटील यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र राठोड करीत आहे.

Protected Content