पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची जळगाव आकाशवाणी केंद्रावर उद्या मुलाखत

जळगाव, प्रतिनिधी । कोराना विषाणूच्या संदर्भात ‘कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या पार्श्वभूमीवर शासनाची तयारी’ या विषयावर पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची आकाशवाणी केंद्रावर उद्या ३० रोजी सकाळी मुलाखत प्रसारीत होणार आहे.

राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची ‘कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या पार्श्वभूमीवर शासनाची तयारी’ या विषयावर मुलाखत आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरुन गुरुवार, ३० एप्रिल रोजी सकाळी ठिक ७.१५ वाजता प्रसारित होणार आहे. या मुलाखतीत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील शासन व जिल्हा प्रशासन करीत असलेल्या उपाययोजना, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे कामकाज, भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विभागाने आखलेल्या उपाययोजनांसह लॉकडाऊनच्या काळात जिल्हावासियांनी घ्यावयाची काळजी याबाबत माहिती देणार आहे. ही मुलाखत जळगाव आकाशवाणीचे ज्येष्ठ उद्घोषक सतीश पप्पु यांनी घेतली आहे. जिल्हावासियांनी ही मुलाखत जळगाव आकाशवाणीवर ऐकायला विसरु नये. असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी केले आहे.

Protected Content