कोरोना : जिल्ह्यात दिवसभरात एकही रूग्ण आढळला नाही

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात एकही बाधित रूग्ण आढळून आला नाही. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयात कडून आज प्राप्त झालेल्या अहवात दिवसभरात एकही बाधित रूग्ण आढळला नाही. जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ४२ हजार ७७० बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार १७८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर १५ रूग्ण उपचार घेत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २ हजार ५७७ रूग्णांचा कोरोना उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

Protected Content