दहावीच्या विद्यार्थींनीचा विनयभंग करणाऱ्या संशयिताला अटक

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील एका गावात राहणारी दहावीच्या विद्यार्थींनाचा पाठलाग करून विनयभंग करणाऱ्या संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भडगाव पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, भडगाव तालुक्यातील एका गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सध्या ती दहावीच्या वर्षात शिकत असून तिचे बोर्डाचे पेपर सुरू आहेत. १ मार्च ते १५ मार्च दरम्यान दहावीचा पेपर देण्यासाठी जात असतांना योगेश अशोक पाटील हा तिचा पाठलाग करत होता. दरम्यान बुधवार १५ मार्च रोजी दुपारच्या सुमारास पिडीत मुलीचा त्याने रस्ता आडविला. त्यानंतर ‘मी तुझ्यावर प्रेम करतो.. तु का नाही म्हणत आहे’.. असे बोलून तिचा हात पकडला. त्यानंतर ‘तु मला ध्यानात ठेवू मी तुला बघुन घेईन’ असा दम दिला. आणि तिचा विनयभंग केला. प्रकार घडल्यानंतर पिडीत मुलीने भडगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली होती. पिडीत मुलीच्या तक्रारीवरून संशयित आरोपी योगेश अशोक पाटील यांच्या विरोधात भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांनी २४ तासाच्या आत संशयित आरोपीला अटक करण्यात आली.

Protected Content