विवाहितेचा हुंड्याच्या पैशांसाठी छळ; पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील पिंप्राळा येथील माहेर असलेल्या विवाहितेचा हुंड्याच्या पैशांसाठी छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या मंडळीविरोधात बुधवार, २१ सप्टेंबर रोजी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव शहरातील पिंप्राळा येथील माहेर असलेल्या स्वाती सुनील बाविस्कर वय ३५ यांचा विवाह चोपडा तालुक्यातील गोरगावले येथील सुनील आधार बाविस्कर यांच्यासोबत झाला आहे. लग्नानंतर तीन वर्षांनी पती सुनील यांनी यांच्यासह सासू, सासरे यांनी स्वाती यांचा हुंड्यांच्या पैशांसाठी छळ केला. याच कारणावरुन स्वाती हिस शिवीगाळ करत चापटा, बुक्क्यांनी मारहाणसुध्दा करण्यात आली.

छळाला कंटाळून अखेर स्वाती बाविस्कर ह्या माहेरी पिंप्राळा येथे निघून आल्या व त्यांनी छळाबाबत बुधवार २१ सप्टेंबर रोजी रामानंदनगर पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन स्वाती यांचे पती सुनील आधार बाविस्कर, सासू हिराबाई आधार बाविस्कर, सासरे आधार बुधा बाविस्कर तिघे रा. गोरगावले ता. चोपडा यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक कालसिंग बारेला हे करीत आहेत.

Protected Content