भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रोहित कोपरकर या युवकाच्या खून प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघांना न्यायालयाने १३ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, वांजोळा रोडवरील गंगानगर पाठीमागील गोपाळ सावळे यांच्या शेतात कुजलेला मृतदेह आढळला होता. पँट व चप्पलेवरून पोलिसांनी याची ओळख पटवली असता हा तरूण शहरातील रामदेव बाबा नगरातील रोहित दिलीप कोपरेकर (वय २२) असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून सागर दगडू पाटील (वय २२,रा. भुसावळ) आणि राहुल राजेश नेहेते (वय १९, रा. पाटील मळा, भुसावळ) यांना बाजारपेठ पोलिसांनी अटक केली होती.
या आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने सोमवार दिनांक १३ जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, एपीआय मंगेश गोटला तपास करत आहेत.