गणेश कॉलनीत वाळूने भरलेले डंपर पकडले; जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील गणेश कॉलनीतून अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारे डंपर पोलिसांनी पकडले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून डंपर जप्त करण्यात आले आहेत.

जिल्हापेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गणेश कॉलनी भागात गुरूवार ९ जून रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास पोलीस कर्मचारी गस्तीवर असतांना विना क्रमांकाचे डंपर वाळू वाहतूक करत असताना आढळून आले. वाळू वाहतूकीचा परवाना असल्याबाबत परवाना विचारला असता चालक पंढरी बाबुलाल कोळी (वय-३०) रा. वाल्मिक नगर जळगाव याने परवाना नसल्याचे सांगत उडवाउडवीचे उत्तरे दिली. या प्रकरणी पोलिसांनी वाळूने भरलेले जप्त करून जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या आवारात लावण्यात आले आहे. याप्रकरणी पोहेकॉ तेजराव हुडेकर यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात डंपर चालक पंढरी कोळी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक निर्मल चव्हाण करीत आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!