…आणि त्या वृद्धेनं राहुल गांधीं यांना केली सगळी संपत्ती दान

दिल्ली – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था | पुष्पा मुंजियाल या वृद्धेनं तिचे मृत्यूपत्र न्यायालयात सादर करून तिच्या दागिन्यांसह तिच्या संपूर्ण मालमत्तेचे मालकी हक्क राहुल गांधी यांना दिले आहेत.

एका वृद्धेनं तिची संपूर्ण संपत्ती काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या नावे केली आहे. मृत्यूपत्र सादर करून दागिन्यांसह तिच्या मालमत्तेचे मालकी हक्क राहुल गांधी पुष्पा मुंजियाल या वृद्धेनं न्यायालयात दिले आहेत. असं या वृद्धेचं नाव आहे.

‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार, उत्तराखंडच्या ७८ वर्ष वय असलेल्या पुष्पा मुंजियाल या डेहराडूनमध्ये राहतात. त्यांनी १० तोळे सोन्यासह त्यांची सर्व मालमत्ता, त्यांची ५० लाखांची संपत्ती काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नावावर केली आहे.

पुष्पा मुंजियाल यांनी डेहराडून न्यायालयात एक मृत्यूपत्र सादर केले असून, राहुल गांधी यांचे विचार देशासाठी आवश्यक असल्याचे सांगत त्यांच्या  विचाराने प्रभावित होत त्यांच्या मालमत्तेचे मालकी हक्क गांधी यांना दिले आहेत.

Protected Content