पिस्तुल घेऊन फिरणार्‍याला एलसीबीने ठोकल्या बेड्या

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पिस्तुलच्या मदतीने दहशत माजविणार्‍याला एलसीबीच्या पथकाने गजाआड केले आहे.

अश्विन विजय हिरे (वय २०, रा. खंडेरावनगर) हा पिस्तूल घेऊन फिरत होता, ही माहिती एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथक तयार केले. या पथकातील सुधाकर अंभोरे, महेश महाजन, विजय पाटील, प्रितम पाटील, सचिन महाजन, पंकज शिंदे यांच्या पथकाने खंडेरावनगर भागात सापळा रचून अश्‍विनला ताब्यात घेतले.

सदर पथकाने अश्विनची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून ३० हजार रुपये किमतीचे पिस्तूल पोलिसांना मिळून आले. हे पिस्तूल जप्त करुन त्याला अटक करण्यात आली असून रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
%d bloggers like this: