धक्कादायक : झोपलेल्या प्रौढाचे अपहरण करून मारहाण करून लुटले !

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील खापरखेडा येथील प्रौढ व्यक्ती हे घराच्या अंगणात झोपलेले असतांना त्यांना चार जणांनी उचलून नेत त्यांना वाहनातून घेवून जात त्यांना मारहाण करून जवळील अडीच हजार काढून घेतले त्यानंतर त्यांना ढेकू अंबासन गावातील घोडागाडीला बांधून पसार झाल्याची धक्कादायक घटना ३० मार्च रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी सोमवार १ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता मारवड पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, संजय ओंकार रायसिंग वय ४९ रा. खापरखेडा ता. अमळनेर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शनिवार ३० मार्च रोजी रात्री ९.३० वाजता ते त्यांच्या घरासमोरील अंगणात झोपलेले होते. त्यावेळी डोंगर सोनवणे, मयूर उर्फ डोंगर सोनवणे दोन्ही रा. ढेकू अंबासन ता. अमळनेर आणि इतर अनोळखी दोन जण असे चार जणांनी संजय रायसिंग यांना जबरदस्ती वाहनात बसवून नेले. त्यानंतर रस्त्यावर वाहन थांबवून संजय रायसिंग यांना बेदम मारहाण केली. त्यांच्या खिश्यातून अडीच हजार रूपये काढून त्यांना पुन्हा वाहनात बसवून ढेकू अंबासन येथील घोडागाडील बांधून पसार झाले. ही घटना घडल्यानंतर त्यांनी सोमवारी १ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता मारवड पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार डोंगर सोनवणे, मयूर उर्फ डोंगर सोनवणे दोन्ही रा. ढेकू अंबासन ता. अमळनेर आणि इतर अनोळखी दोन जण यांच्या विरोधात मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील हे करीत आहे.

Protected Content