Home Cities अमळनेर बंद घर फोडून सोन्याचे दागिन्यांसह रोकड घेवून चोरटे पसार !

बंद घर फोडून सोन्याचे दागिन्यांसह रोकड घेवून चोरटे पसार !

0
61

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील पाडळसरे येथील बंद घराचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत सोन्याचे दागिने आणि २७ हजारांची रोकड असा एकुण ८७ हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीला आले आहे. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मारवड पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, जुगल राजेंद्र पाटील वय ३६ रा. पाडळसरे ता. अमळनेर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. शनिवार ३० मार्च रोजी सकाळी ९ वाजता ते घर बंद करून अमळनेर येथे कामाच्या निमित्ताने गेले होते. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कडी कोयंडा तोडून घरातून सोन्याचे दागिने आणि २७ हजारांची रोकड असा एकुण ८७ हजार रूपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना दुसऱ्या दिवशी रविवारी ३१ मार्च रोजी सकाळी ९ वाजता उघडकीला आले. त्यांनी याबाबत मारवड पोलीसांना माहिती दिली. पोलीसांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला. याप्रकरणी सोमवारी १ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता मारवड पोलीसात तक्रार देण्यात आली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound