कोरोना : जिल्ह्यात आज ४ संक्रमित रूग्ण आढळले; ६ रूग्ण झाले बरे !

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात ४ संक्रमित रूग्ण आढळून आले आहे. तर ६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस.चव्हाण यांनी दिली आहे. 

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातून १, भडगाव-१ आणि चाळीसगाव तालुक्यातून २ असे एकुण ४ संक्रमित रूग्ण आढळून आले आहे. कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात आजपर्यंत एकुण १ लाख ४२ हजार ६८२ रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार ८१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २६ बाधित रूग्ण हे जिल्ह्‌यातील विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकुण २ हजार ५७५ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे. 

Protected Content