मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे यांच्यातर्फे मुक्ताईनगरात आज सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या झोपलेल्या अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी फटाके फोडो आंदोलन करण्यात येत आहे.
सदर बँकेचे खातेदार १. कविराज विठ्ठल पाटील २. शोभा कविराज पाटील ३. नितीन रघुनाथ पाटील यांनी सन २०१९-२० मध्ये फळविमा काढलेला होता व सदर खातेधारक विमा कंपनीच्या निकषांनुसार त्या नुकसानभरपाईच्या लाभास पात्र होते.
परंतु बँक प्रशासनाने संबंधित शेतकर्यांच्या महसूल मंडळ नोंदणीमध्ये चूक केल्यामुळे सदर शेतकरी बँक चुकीमुळे विम्याच्या लाभापासून वंचित राहिले व शासनाच्या तसेच कृषी आयुक्त, जिल्हा प्रशासन यांच्या आदेशानुसार संबंधित शेतकर्याना या नुकसान भरपाईची रक्कम बँकेकडून तात्काळ देण्याचे आदेशित करण्यात आले. तसेच सदर पिडीत शेतकऱ्यांना लाभ देण्यास टाळाटाळ करणार्या सेंट्रल बँक ऑफ इंडियावर आर्थिक गुन्हे शाखेद्वारे गुन्हयांदेखील दाखल आहे. तरीसुद्धा बँक प्रशासनाकडून पीडित शेतकर्यांना वारंवार बँकेच्या फेन्या कराव्या लागत असून सदर लाभाची रक्कम आज देऊ उद्या देऊ, पुढच्या आठवड्यात देऊ असे वेळकाढूपणा करून झोपेचे सोंग घेतले जात आहे.
संबंधित बँक प्रशासनाकडून पिढी शेतकर्याना रात्री अकरा – अकरा वाजेपर्यंत बँकेत तात्काळ बसवून ठेवण्यात येते जेणेकरून संबंधित पीडित शेतकरी त्रस्त होऊन लाभाच्या रकमेची मागणी करण्यापासून परावृत्त व्हावा अथवा स्वत: च्या जिवाचे काहीतरी बरेवाईट करून घ्यावे, यासाठी या निगरगट्ट बँक प्रशासनाकडून प्रोत्साहित केले जात आहे.
या संदर्भात आम्ही शासन व प्रशासनाकडे विविध मोर्चे, आंदोलने, उपोषणे करून दाद मागत असून शासन व प्रशासनाने संबंधित पीडित शेतकऱ्यांना तात्काळ लाभ देण्याचे आदेशीत करूनसुद्धा संबंधित बँक प्रशासन झोपेचे सोंग घेऊन वेळकाढूपणा करत असल्यामुळे अशा या झोपलेल्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया प्रशासनाला जागे करण्यासाठी आज दि.२८/०२/२०२२ रोजी बँकेसमोर फटाके फोडो आंदोलन करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य ईश्वर हटकर, ग्रामपंचायत सदस्य नितीन पाटील, सचिन पाटील, अनिकेत सोनार, उत्तम जुमडे, सुरेश पाटील, हेमंत पाटील, आर्य सोनावणे व इतर बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/499038151837237