राज्यपालांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे आंदोलन (व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषधार्थ आकाशवाणी चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. पोलीसांनी निदर्शने करणाऱ्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड करून ताब्यात घेतले आहे.

 

यासंदर्भात माहिती अशी की, राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एका कार्यक्रमा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे कालपासून जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहे. सोमवारी दुपारी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जैन हिल्स येथून कार्यक्रम आटपून राज्यपाल विद्यापीठाकडे दुपारी १ वाजता निघणार होते. याच रस्त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यपालांच्या विरोधात घोषणा देऊन निषेध व्यक्त करण्यात आला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार निषेध केला.

राज्यपालाच्या ताफ्यांना कोणतेही व्यत्यय येवू नये म्हणून आकाशवाणी चौकात तैनात असलेले जिल्हापेठ पोलीस कर्मचारी पोलीसांचा बंदाबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, दुपारी १ वाजेच्या सुमारास राज्यपाल यांचा ताफा येण्यापुर्वी आकाशवाणी चौकात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी हे आंदोलन करण्याच्या पवित्र्यात होते. यावेळी पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते काळे झेंडे दाखवणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यापूर्वीच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. राज्यपालांच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1167268094013387

 

Protected Content