जनकल्याणाकरिता संतांचा जन्म – संत गोपाळ महाराज

WhatsApp Image 2019 12 25 at 7.01.38 PM

पाल. ता रावेर, प्रतिनिधी | पाल सारख्या छोट्यास्य गावात बापूजीचा जन्म झाला येथेच राहून वीरांन टेकडीवर भक्ती जोत पेटवली आणि पालसह देशभराला प्रकाशमान केले. आज देशभरात हजारो चेतन्य साधक त्या प्रकाशाच्या उजेडात आपले जीवन प्रकाशित करीत आहे. जन कल्याणाकरिताच संत या धरावर जन्मला येतात असे गोपाल चेतन्य महाराज यांनी सांगितले. ते पाल येथे झालेल्या प. पूज्य लक्ष्मण चेतन्य बापूजी पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त बोलत होते.

अखिल भारतीय चैतन्य साधक परिवाराचे प्रणेते आणि श्री वृन्दावन धाम आश्रमाचे संस्थापक परम पूज्य सदगुरु संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांच्या १० व्या पुण्यतिथि सोहळा निमित्त संत महंत आणि हजारो अखिल भारतीय चेतन्य साधक परिवारा पाल रुंधावन धाम आश्रमात उपस्थित राहून परम पूज्य लक्ष्मण चेतन्य बापूजीना श्रद्धांजली अर्पित केली. त्या निमित्ताने २३ डिसेंबरपासून नाम जप साधना शिबीर, येथील राजस्थानी कलाकृतीने सज्ज भव्य दिव्य हरी धाम मंदिर वर्धापनदिवस तसेच बापूजीचे गुरुवर्य संत दंगडुजी महाराज जयंती निमित्त हजारो दीपक लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. सकाळी पाच वाजेपासून बापूजी समाधी दर्शनाला सुरवात झाली. महाआरती, पादुका पूजन त्यानंतर गुरूंदीक्षा व सकाळी १० वाजेपासून देशभरातून आलेल्या संत महंतांचे श्रधावचन आणि पूज्य गोपाळ चेतन्य महाराज याच्या अमृत वाणीतुन सतसंगचा अमृताचा लाभ भक्तांनी घेतला. यावेळी संतपंथ फैजपुरचे महामंडलेश्वर स्वामी जनार्धन हरिजी महाराज, स्वामी नारायण गुरुकुल सावदा येथील महंत भक्तिप्रसाद शास्री जी महाराज, महानुभाव सावदा येथील संत श्री मानकर बाबाजी शास्री, दत्त आश्रम डोंगरदेचे स्वामी श्री स्वरूपानंद जी महाराज, बुरहानपुर सांडसचे संत श्री सरसपुरीजी महाराज, राम मंदिर कुसुम्बाचे महन्त श्री भरतदास जी महाराज, मध्यप्रदेश खलघाट धामनोदचे महंत श्री कृष्णदास जी महाराज, नंदुरबार प्रकाशा येथील साध्वी कमल माताजी, कैलाश धाम झिरन्या( म.प्र)चे महन्त श्री राघवानंद भारती जी महाराज, साबरपाट जिन्सीचे महंत श्री गणेश गिरीजी महाराज, चाळीसगांवचे संत श्री विशुद्धानद शास्रीजी महाराज, रामदेवबाबा मंदिर भगवान पूरा (म.प्र) येथील महंत श्री रामदास त्यागीजी महाराज, हनुमान आश्रम सतवाड़ा (म.प्र) येथील महंत श्री संतोष दासजी महाराज आदि संतांची पावन उपस्थिति होती. भारतीय चैतन्य साधक परिवारातर्फे बापूजी पुण्यतिथी चे भव्य आयोजन करण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे परम पूज्य लक्षण चेतन्य बापूजी पुण्यतिथी निमित्त बापिजींच्या समाधीवर मुस्लिम बांधवातर्फे हिरवी चादर चढवून हिंदू मुस्लिम राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडविले जाते. आमदार राजुमामा भोळे, मध्यप्रदेश भिकनगावचे आमदार झूम सोलंकी, रावेर पोलीस स्टेशनचे पो. निरीक्षक रामदास वाकोडे, सा. पो. उ. नि. राजेंद्र राठोड, अतुल तडवी, गोविंद पाटील, गोपनीय शाखेचे करोडपती उपस्थित होते. महाप्रसादानतर या महोत्सवाची सांगता करण्यात आली.

Protected Content