निसर्ग शेती मंडळाने जागतीक बाजारपेठत पोहचवीला संद्रीय शेतमाल

jamner news 3

जामनेर प्रतिनिधी । जामनेर येथील निसर्ग शेती मंडळाने राज्यासह सिमावर्ती राज्यांमध्ये असंख्य कृषीतज्ञ घडवीले. १९९३ साली विषमुक्त शेतीची कास धरून येथील किसन मोतीराम महाजन यांनी निसर्ग शेतीमंडळाची स्थापना केली होती. निसर्ग शेती मंडळातून प्रशिक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांना फलोत्पादनाचे धडे दिले. त्यांच्या शेतमालाल जागतीक बाजारपेठ उपलब्ध करून दिली, असे मत लोहारा येथील कृषीभुषण विश्वासराव पाटील यांनी व्यक्त केले. निसर्ग शेती मंडळाचे अध्यक्ष किसन महाजन यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जमलेल्या अनेक सेंद्रीय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी १९९३ सालापासूनच्या स्मृतींना उजाळा दिला.

जुन्या काळातील १० वीतून कृषी कार्स प्रशिक्षण घेतलेल्या किसन महाजन यांनी सेंद्रीय शेती सुरू केली. विषमुक्त शेतीची कास धरून त्यांनी १९९३ साली जामनेर येथे निसर्ग शेती मंडळाची स्थापना केली. राज्यातीलच नव्हे तर लगतच्या मध्ये प्रदेश, गुजरात, आंध्रप्रदेश, कर्णाटक या राज्यांतून जवळपास १७ हजारावर शेतकरी या निसर्ग शेती मंडळाशी जोडले गेले. गजानन नर्सरी येथे प्रशिक्षण घेतलेल्या संबंधीत राज्यातील ६३४ शेतकऱ्यांना शासनाकडून सेंद्रीय शेतीचे प्रमाणपत्र मिळाले. तर केळी, पपईची प्युरी, सेंद्रीय पध्दतीने उत्पादीत उसाचा व त्याच पध्दतीने तयार केलेला गुळ, सेंद्रीय पध्दतीने पिकवीलेला कापूस अशा उत्पादीत मालाला मुंबई येथील प्रसिध्द असलेल्या मदर डेअरीच्या सहकार्याने जागतीक बाजारपेठ उपलब्ध करून दिली. येथे प्रशिक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी आपापल्या परिसरात सेंद्रीय शेतीचा प्रचार प्रसार केला. तर राज्यशासनाने सुरू केलेला २००४ सालीचा पहिलाच सेंद्रीय शेतीचा पुरस्कार किसन महाजन यांना देण्यात आला आहे. आजही राज्यासह परराज्यात विषमुक्त शेतीची कास धरून हजारो शेतकरी सेंद्रीय शेती करीत आहेत. बुणवार ता. २५ रोजी निसर्ग शेतीमंडळाचे संस्थपक असलेल्या किसन महाजन यांचा अनुयायी, मित्र परिवाराने अभिष्टचिंतन सोहळा आयोजित केला होता. लक्ष्मण रावजी चिंचोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सोहळ्यास जेष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष नारायण चौधरी, कृषी विद्यावेत्ता बी.डी.जडे, कृषी भुषण रविंद्र पाटील, कृषीभुषण राजेश पाटील, उद्यान पंडीत रवींद्र महाजन यांचेसह मान्यवर उपस्थीत होते. सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन अनील चौधरी यांनी केले.

गटशेतीची गरज
डेव्हीड फेरीचॉईन या शास्त्रज्ञाने जगभर फिरून विवीध फळझाडे, झाडे, वेलींची रोपे, बियाणे मिळवून १९६४ साली दोन लाख कलमा तयार करून गटशेती करण्याची संस्कृती रूजवीली. त्यामुळे आज अमेरीका ही फळफळावळांनी समृध्द आहे. मुळात गटशेती ही भारतात श्रीकृष्णाने सुरू केली आहे. तोच कित्ता किसन महाजन यांनी निसर्ग शेती मंडळाच्या माध्यमातून गिरीवीत राज्यासह परराज्यातील असंख्य शेतकऱ्यांना ज्ञान दिले. आज पुन्हा गटशेतीची गरज निर्माण झाल्याचे मत कृषीभुषण विश्वासराव पाटील यांनी व्यक्त केले.

यांचे लाभले मार्गदर्शन
१९९३ पासून सुरू झालेल्या निसर्ग शेतीमंडळात कोल्हापूर जिल्ह्यातील ऋषी-कृषी तंत्रज्ञानाचे प्रणेते स्वर्गीय मोहन शंकर देशपांडे, उहाणू येथील भास्कर साने (गुरूजी), आपल्या शेतात किती व कसा पाऊस पडेल याचा अचूक अंदाज वर्तवीणारे तज्ञ विजय भट, सर्टीफिकेशन तज्ञ संजय देशमुख, प्रोसेसींग तज्ञ डी.एन.कुलकर्णी, आरती संस्था पुण्याचे अनंत कर्वे, पुणे येथील जलसंवर्धन तज्ञ पी.बी.शितोळे अशा जागतीक दर्जाच्या तज्ञांचे निसर्ग शेतीमंडळाच्या सभासदांना मार्गदर्शन लाभले आहे.

Protected Content