धनाजी नाना महाविद्यालयात ‘चित्र रथ यात्रा’ उत्साहात

फैजपूर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, विद्यार्थि विकास विभाग आणि धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमा अंतर्गत आज ‘चित्र रथ यात्रा’ आयोजित करण्यात आली.

त्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार शिरीष चौधरी यांनी सांगितले की, स्वातंत्र्याच्या इतिहासात अजर अमर असलेली घटना म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस ग्रामीण अधिवेशन होय, 1936 साली स्वातंत्र्य लढ्याच्या या मोठ्या पर्वात स्व.धनाजी नाना चौधरी यांच्या सहित बोंडे, शंकरराव देव, साने गुरुजी यांचे मोठे योगदान होते. काँग्रेसच्या या भव्य सोहळ्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, पंडित मदन मोहन मालवीय, डॉ.राजेंद्र प्रसाद, विजया लक्ष्मी पंडित, सरोजिनी नायडू, सरदार वल्लभभाई पटेल सारख्या अनेक हुतात्म्यांनी एका सुरात ब्रिटिशांच्या विरोधात आपली भूमिका स्पष्ट केली होती. थोडक्यात हे अधिवेशन म्हणजे ब्रिटिश शासनाच्या विरोधात ग्रामीण जनतेत पेटवीलेला अलख होता, या सर्व आठवणी चित्ररथ यात्राच्या निमित्ताने पुन्हा ताज्या होत आहेत. त्याबद्दल खूप अभिमान वाटतो असे ते म्हणाले.

गावात ठिक ठिकाणी चहा पणाची व्यवस्था यांनी तर सुरक्षा व्यवस्थासाठी फैजपूर पोलिस कार्यालयाचे मोलाचे सहकार्य लाभले. यात्रेची सुरुवात धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर येथील प्रेरणा स्तंभ पासून, पुढे फैजपूर शहरात सुभाष चौक, म्युनिसिपल हायस्कूल, पी.वाय.चौधरी स्कूल,मौलाना अबुल कलाम आझाद हायस्कूल ते कुसुमताई विद्यालय मार्गाने परत धनाजी नाना महाविद्यालय येथे समारोप करण्यात आला, या चित्ररथ यात्रेत ऐतिहासिक वास्तू, घटना, उपक्रम, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आंदोलने, स्वातंत्र्याचा इतिहासाबद्दल जाणीव जागृती करणाऱ्या अनेक गोष्टींचे चित्र रूप सादर करण्यात आले होते.

चित्र रथयात्राला सकाळी 7:30 वजता हिरवी ध्वजा दाखवीत डॉ.विनोद पाटील, कुलसचिव, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांनी उद्घाटन केले. प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी एस.के.चौधरी, के.आर.चौधरी, एम.टी.फिरके, लीलाधर चौधरी, डॉ.जी.पी.पाटील, प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी, डॉ.व्ही.आर.पाटील, उप प्राचार्य डॉ.उदय जगताप, प्रा.डी.बी.तायडे, चित्ररथ यात्रा समिती प्रमुख डॉ. जगदीश खरात, समितीतील सर्व सदस्य, सर्व प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी, एनएसएस, एनसीसी विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संखेने उपस्थित होते.

Protected Content