सोमवारी होणारा महिला लोकशाही दिन रद्द !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी होणारा महिला लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे. याची संबधीत समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी नोंद घ्यावी. असे विजयसिंग परदेशी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

 

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव यांच्यामार्फत समस्याग्रस्त व पीडीत महिलांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून त्यांना न्याय मिळावा. यासाठी महिलांच्या तक्रारी व अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पीडीत महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी एक प्रभावी उपाययोजना महणून महिला लोकशाही दिन जिल्हा स्तरावर दर महिन्याच्या तिसरा सोमवार व तालुकास्तरावर प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी राबविण्यात येतो.
सध्या करोनाच्या वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता दि. 20 जुलै, 2020 रोजीचा लोकशाही दिन रद्द करण्यात येत असल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी कळविले आहे.

Protected Content