आव्हाने शिवारात रोडच्या कामामुळे पाण्याचा निचरा न झाल्याने उभी पिके पाण्यात; नुकसानभरपाईची मागणी (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । जळगाव-चोपडा रस्त्यावर असलेल्या रोडाचे रूंदीकरणाचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. रस्त्याची रूंदी वाढविल्याने दोन दिवसांपासून पाऊस झाल्यामुळे तालुक्यातील आव्हाने शिवारातील शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबले आहे. पाणी तुंबल्यामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी शेतातील पाण्याचा निचरा करावा आणि पिकांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.

अधिक माहिती अशी की, तरूण शेतकरी अमोल तेजपाल चौधरी रा. आव्हाणे ता.जि.जळगाव यांचे आव्हाणे शेत शिवारात जळगाव-चोपडा रस्त्यावर शेत आहे. रस्त्याच्या लागून शेत असल्याने रोडाची रूदी वाढवित असतांना ठेकेदारने जेसीबीच्या सहाय्याने रोडच्या बाजूलाच पाच फुट खोल चारी केली होती. गेल्या दोन दिवसांपासून जळगाव तालुक्यात पाऊस झाला. मात्र तयार केलेल्या चारीमुळे पाण्याचा निचरा झालाच नाही. या संदर्भात रोडाचे काम करणाऱ्या सुपरवाईजरला विचारले असता शेतकऱ्याला उडवाउडवीची उत्तरे मिळाली. संतप्त झालेल्या शेतकऱ्याने पाण्याचा निचरा करा अन्यथा कायदेशीर कारवाईला समोरे जावे लागेल असे सांगल्यावर जेसीबीच्या माध्यमातून शेतातील पाण्याचा निचरा केला. मात्र हा प्रश्न तात्पूरता सोडविला गेला. कायमस्वरूपी पाण्याचा निचरा व्हावा, तसेच पिकांची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी संबंधित ठेकेदाराकडे केली आहे.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/3001141999984401/

Protected Content