मोहन नगरातून तरूणाची दुचाकी चोरट्यांनी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील मोहन नगरातून तरुणाची २० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहितीशी की, हेमंत संतोष बडगुजर रा. कुपनगरी आव्हाणा ता. जि. जळगाव हे आपल्या कुटुंबियांचा वास्तव्याला आहे. ते इलेक्ट्रिशियनचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांनी जळगाव शहरातील मोहन नगर येथे इलेक्ट्रिशियनचे काम घेतलेले होते. त्या निमित्ताने बडगुजर हे रविवारी ३० जुलै रेाजी दुपारी ४ वाजता सुमारास साईडवर काम करण्यासाठी दुचाकी (एमएच १९ एसबी ६७२) ने कामावर आले. हेमंत बडगुजर यांनी दुचाकी काम करण्याच्या ठिकाणी बाहेर पार्किंग करून लावली होती.

दरम्यान अज्ञात चोरट्यांनी २० हजार रूपये किंमतीची चोरून नेली. घरी जाण्याचा तयारीत असताना त्यांना जागेवर दुचाकी आढळून आली नाही. त्यांनी परिसरात दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला असता दुचाकी मिळाली नाही.

अखेर सोमवारी १ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विनोद सूर्यवंशी करीत आहे.

Protected Content