इतका बंदोबस्त तर पाकिस्तान-चीनच्या सीमेवरही बघितला नाही

 

मुंबई : वृत्तसंस्था । चीनच्या वा पाकिस्तानच्या सीमेवरही मी इतका बंदोबस्त बघितला नाही. इतका बंदोबस्त शेतकऱ्यांसाठी करण्याची आवश्यकता नाही. त्यांच्या मागण्या समजून घेतल्या पाहिजे,” असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.

मागील दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर शेतकरी आंदोलन सुरू आहे. शेतकरी आणि सरकारमध्ये अजूनही तोडगा निघालेला नसून, दिवसेंदिवस आंदोलन चिघळताना दिसत आहे. दुसरीकडे टिकरी, सिंघू आणि गाझीपूर येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची नाकेबंदी केंद्र सरकारनं केली असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त करत सरकारला सुनावलं आहे.

बेलापूर येथील न्यायालयात हजर राहिल्यानंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी सवाद साधला. यावेळी राज यांना शेतकरी आंदोलनासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर राज ठाकरे म्हणाले, “मला असं वाटतं हे फारच चिघळलं आहे. आम्ही हे सगळं पाहतो आहोत. शेतकऱ्यांच्या मागे कोण आहेत… त्यांना पैसे कुठून येतायेत वगैरे. सरकारनं जो कायदा आणला आहे, तो कायदा चुकीचा नाही. पण, केंद्राने राज्यांचा विचार करून, राज्यांशी चर्चा करून याची अंमलबजावणी केली पाहिजे. शेवटी प्रत्येक राज्यामध्ये कृषी खातं आहे. प्रत्येक राज्याची कृषी धोरणं वेगळी आहे. प्रत्येक राज्याच्या कृषी मंत्री वा मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घ्यायला पाहिजे होतं. हे प्रकरण इतकं चिघळायची गरज नव्हती.

प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारावर बोलताना राज ठाकरे यांनी मोदी सरकारला इशाराही दिला. “कसं आहे शेवटी ताण ताणत आपण कुठपर्यंत नेणार आहोत? एक २६ जानेवारी काय घेऊन बसला आहात तुम्ही याच्यामध्ये…,” असं म्हणत राज ठाकरेंनी मोदी सरकारला सावधगिरीचा इशारा दिला.

Protected Content