पक्षप्रमुखांच्या भाषणाने ऊर्जा दिली — ना . गुलाबराव पाटील ( व्ही डी ओ )

 

 

जळगाव : प्रतिनिधी । स्वबळ म्हणजे आत्मबल आणि ते आमच्याकडेही आहे हा संदेश आज आम्हाला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला त्यातून सदैव कामाची ऊर्जा मिळाली , असे आज पालकमंत्री आणि राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले

 

शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित  पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलेल्या  मार्गदर्शनानंतर वार्ताहरांशी बोलताना पालकमंत्री आणि राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की , काँग्रेसने आधी स्वबळाचा  नारा दिला खरा पण त्यांच्या पक्षाने काय भूमिका घ्यावी हा त्यांचा प्रश्न आहे  त्यावरच आज उद्धव ठाकरे म्हणाले की स्वबळ म्हणजे काही फक्त निवडणुकांपुरते दाखवायचे नसते स्वबळ म्हणजे आत्मबल हे सदैव जोपासायचे असते त्यातूनच आपण समाजाला , देशाला , राज्याला न्याय देण्याची जबाबदारी पेलू शकतो आणि भूमिका जनकल्याणाची घेऊ शकतो त्यामुळे ते आत्मबल म्हणजे स्वबळ आमच्याकडेही आहे हाच त्यांचा आजचा संदेश आम्हाला शिवसैनिकांना वर्षभर ऊर्जा देणारा आहे , सरकार म्हणून आणि पक्ष म्हणून आम्ही काय  भूमिका घेऊन काम केले पाहिजे , आपली भूमिका न सोडता कसे पुढे गेले पाहिजे हेही पक्षप्रमुखांनी आज सांगितले . हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व ही  देशासाठीची भूमिका आणि महाराष्ट्रात मराठी माणसाचे हित , ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हा दिवंगत शिवसेनाप्रमुखांनी दिलेला मंत्र  यापुढेही आमच्यासाठी प्रमाण राहणार आहे उद्धव ठाकरे हे चांगल्या पद्धतीने ३ पक्षांचे सरकार चालवत आहेत महाविकास आघाडीत काँग्रेस पक्षाला हिनवले जाते हे भाई जगताप यांचे वैयक्तिक मत असू शकेल पण मंत्रिमंडळात निर्णय सर्व सहमतीने होतात असेही ते म्हणाले .

 

आमदार गोपीचंद पाडळकर यांनी वारी बद्दल घेतलेल्या भूमिकेबद्दल ना . गुलाबराव पाटील म्हणाले की , वारी काही फक्त असा शिवसेनेचाच कार्यक्रम आहे असे नाही  वारी सगळ्या संतांच्या विचारधारेची आहे पांडुरंगाच्या सगळ्या भक्तांची आहे  कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत मानाच्या सगळ्या पालख्यांच्या प्रमुखांशी आधी चर्चा करून सरकारने निर्णय घेतले आहेत वारीमध्ये १  जण गेला काय , १० जण गेले काय किंवा १०० जण गेले काय ? ते यंदा महत्वाचे नाहीय  त्यामुळे अशी सगळ्यांची भूमिका असावी की पांडुरंगा , यंदा आमची मजबुरी समजून घे , कोरोना कायमचा संपवून ताक आणि पुढच्या वर्षी आम्हाला लाखोंच्या संख्येने पंढरपुरात येऊ दे , असेही ते म्हणाले .

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/785571015489088

 

Protected Content