पी.एस.पाटील विद्यालयात अप्पासासाहेबांना अभिवादन

 

पाचोरा, प्रतिनिधी |   नांद्रा   ( ता.पाचोरा ) येथील  दि. शेंदूर्णी एज्युकेशन सेंकडरी सोसायटीचे सचिव कै. आप्पासाहेब पी. एस. पाटील यांच्या चौथ्या स्मृतीदिनानिमित्ताने  पी. एस. पाटील माध्यमिक विद्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले 

 

आप्पासाहेबांच्या कार्याचा आलेख त्यांचे  जावाई  जिल्हा नियोजन अधिकारी  प्रतापराव पाटील यांनी मांडला.जळगाव – पाचोरा – चाळीसगाव सायकलींग ग्रुप च्या वतीने ते ह्या स्मृतीदिनाच्या कार्यक्रमास उपस्थित होते.  कार्यक्रमाचे आयोजन जि. प. सदस्य पदमसिंग पाटील यांनी केले.  भाजपा. तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, पोलिस निरीक्षक धनंजय येरुळे, नांद्राचे  सरपंच विनोद तावडे, माजी सभापती पंढरीनाथ पाटील, टिनी पंजाबी, रवी पाटील, डाॅ. शशी साबळे, रमेश महालपुरे, प्रशांत शेवाळे, अनुप तेजवानी, उज्वल पडोले, समीर रोकडे,  मुख्यध्यापक एस. पी. तावडे यांच्यासह सर्व शिक्षक उपस्थित होते

 

. नांद्रा माध्यमिक विद्यालयाला आप्पासाहेब पी. एस. पाटील माध्यमिक विद्यालयाचे नाव दिलेले आहे.हे दातृत्व धी. शेंदूर्णी एज्युकेशन चे चेअरमन  संजय गरुड यांच्या दातृत्वामुळे  शक्य झाल्याचे जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांनी  सांगितले  कार्यक्रमाच्या  यशस्वीतेसाठी माजी सरपंच शिवाजी तावडे, पंकज बाविस्कर, बंटी सुर्यवंशी, प्रा.यशवंत पवार, पत्रकार राजेंद्र पाटील, प्रास्तविक एस. व्ही. शिंदे सुत्रसंचलक  गजानन ठाकूर यांनी  परिश्रम घेतले

Protected Content