अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्यास अटक; 27 पर्यंत पोलीस कोठडी

Rape Child crime

जळगाव प्रतिनिधी । शहरातील अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्या प्रकरणी शनीपेठ पोलीसात तरूणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तरूणाला अटक केली असून त्याला 27 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, शहरातील कांचन नगर येथील 14 वर्षी अल्पवयीन मुलीला त्याच भागात राहणारा संशयित सचिन संजय मिस्तरी (वय-20) रा. कांचन नगर याने 23 डिसेंबर रोजी रात्री 2 ते पहाटे 5 वाजेच्या दरम्यान तिला फूस लावून पळवून नेले. तिला बऱ्हाणपूरसह इतर भागात घेवून फिरत होता. याप्रकरणी शनीपेठ पोलीसात तरूणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर शनी पेठ पोलीस ठाण्याचे पीएसआय यशोदा कणसे, पोकॉ सलिम पिंजारी, रघुनाथ महाजन, मनोज मेहुलकर यांनी तपास घेतला असता दोघे जळगाव शहरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पिडीत मुलगी आणि संशयीत आरोपीस शहरातील कालिंकामाता मंदीराच्या परीसरातून शनीपेठ पोलीसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी संशयित आरोपी सचिन मिस्तरी यांच्या विरोधात अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी शनीपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितास न्यायालयात हजर केले असता 27 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. पुढील तपास पीएसआय यशोदा कणसे करीत आहे.

Protected Content