शासकीय सेवेत कार्यरत दोन कर्मचारी उद्या सेवा निवृत्त

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील पंचायत समितीचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी सोपान तायडे आणि यावल नगर परिषदचे शिवानंद कानडे हे दोघ कर्मचारी उद्या गुरुवार, दि.३१ मार्च २०२२ रोजी आपल्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत आहेत. त्यांना आपल्या शासकीय कार्यालयाच्या माध्यमातून सेवा निवृत्तीपर निरोप देण्यात येणार आहे.

यावल येथील पंचायत समितीचे कार्यरत असलेले कनिष्ठ प्रशासन अधिकारी सोपान शामराव तायडे हे आपल्या ३९ वर्षाच्या प्रशासकीय सेवा कार्यातून उद्या गुरुवार, दि.३१ मार्च २०२२ रोजी सेवानिवृत्त होत आहे. ते मूळ मुक्ताईनगर तालुक्यातील नरवेल येथील रहीवासी असून २८ ऑगस्ट १९८२ ते १९८४ या वर्षात त्यांनी जळगाव जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागात कनिष्ठ सहाय्यक या पदावर आपल्या शासकीय सेवेची सुरुवात केली होती. त्यांनंतर १९८४ ते १९९४ पर्यंत ‘कृषी विभाग जिल्हा परिषद जळगाव, १९९६ ते १९९७ या कालावधीत त्यांनी यावल येथे ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग कार्य केले. पुढील तीन वर्ष त्यांनी यावल पं.स.च्या शिक्षण विभागात आणि त्यानंतर १७ वर्ष त्यांनी यावलच्या पंचायत समितीमध्ये यशस्वीपणे आपली प्रशासकीय सेवा बजावली.

सर्वांशी अतिश्य नम्र व हसत मुखाने बोलणे सर्वांच्या प्रश्नाची उत्तरे समाधानकारक व अगदी समजवून देणे असे सर्वप्रिय कर्मचारी म्हणून त्यांची ओळख राहीली.

यावल नगर परिषदचे वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेले शिवानंद काशिनाथ कानडे हे देखील आपल्या ३६ वर्षाच्या प्रदीर्घ प्रशासकीय सेवेतून उद्या दिनांक ३१ मार्च २०२२ रोजी सेवानिवृत्त होत आहे , शिवानंद कानडे हे यावल नगर परिषद मध्ये ते १६ ऑक्टोबर १९८६ रोजी ‘पाणी पुरवठा’ विभागात वसुली अधिकारी म्हणुन सेवेत रूजु झाले होते नंतर त्यांची वरीष्ठ लिपिक म्हणून पदोन्नती मिळाली होती. मूळ यावल येथील रहीवासी असलेले शिवांनद कानडे यांचा एक शिस्तप्रिय कार्यतत्पर व दक्ष कर्मचारी म्हणुन ओळखले लौकिक होता.

Protected Content