कुटुंब नियोजन समुपदेशन

बुलढाणा लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – कुटुंब नियोजन समुपदेशन कार्यक्रमासाठी राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आलेले साहित्यावरून बुलढाणा जिल्ह्यात वाद निर्माण झाले आहेत. देण्यात आलेल्या साहित्यावर तसेच लैंगिक आजारापासून होणारे दुष्परिणाम यावर बुलढाणा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिले.
बुलढाणा जिल्ह्यात राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने दिलेल्या कुटुंब नियोजन समुपदेशनासाठी देण्यात आलेले साहित्य घेवून आशा वर्कर्स या ग्रामीण कसे मार्गदर्शन करू शकतात यावर संभ्रम निर्माण झाला होता. यावर राज्यात लोकसंख्या वाढीवर नियंत्रण तसेच लैंगिक आजाराचा प्रसार रोखण्यासाठी घ्यावयाची काळजी या विषयी जनजागृतीवर आरोग्य कर्मचाऱ्याना प्रशिक्षण देण्यात आले आहे. आरोग्य विभागाकडून देण्यात आलेले साहित्याच्या माध्यमातून लैंगिक आजार, ते होऊ नयेत यासाठी घ्यावयाची काळजी, लोकसंख्या वाढीवर नियंत्रण आदी ग्रामीण भागात नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी देण्यात आलेल्या साहित्याच्या संदर्भात बुलढाणा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सांगळे यांनी प्रसार माध्यमांनां यासंदर्भात स्पष्टीकरण दिले.

Protected Content