अल्पवयीन मुलीला पळविले; एकावर गुन्हा

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील एका गावात राहणारी १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला एकाने फुस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नशिराबाद पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील एका गावात १५ वर्षीय मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. १८ शुक्रवार १८ मार्च रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी ही घरी एकटी होती. दरम्यान, संशयित आरोपी भुषण तुकाराम कोळी रा. डांभुर्णी ता. यावल याने तिला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार मुलीचे वडील यांनी दिली आहे. त्यांनी मुलीचा सर्वत्र शोध घेतला परंतू अल्पवयीन मुलगी कोठेही आढळून आली नाही. अखेर त्यांनी रविवारी २० मार्च रोजी नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी भुषण कोळी रा. डांभूर्णी ता. यावल याच्या विरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे करीत आहे.

Protected Content