यावल शहरात तिथीनुसार शिवजयंती उत्साहात साजरी

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे च्या वतीने तिथीनुसार शिवजयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.

येथील सातोद रस्त्यावरील श्रीराम मंदिरात सायंकाळी यावलचे निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, यावल शहर तलाठी ईश्वर कोळी ,जिल्हा परिषदचे माजी गटनेते प्रभाकर सोनवणे यांचे हस्ते हिंदवी स्वराज्यचे संस्थापक छत्रपती शिवरायांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पूजनानंतर शहरातील प्रमुख मार्गाने मिरवणुकीस सुरुवात झाली.
मिरवणुकीत येथील बुरुज चौका जवळील नगीना मशिदीजवळ हाजी शब्बीर खान, माजी उपनगराध्यक्ष हाजी ईकबाल खान , माजी नगरसेवक सैय्यद युनुस सैय्यद युसुफ , माजी नगरसेवक गुलाम रसुल गु. दस्तगीर , हाजी गफ्फार शाह यांच्यासह मोठया संख्येत मुस्लिम बांधवांनी उपस्थित राहुन शिवजयंती च्या मिरवणुकीचे स्वागत केले.

याप्रसंगी उत्सव समितीच्या वतीने मिरवणुकीत ढोल, ताशे, झांज पथकासह युवकांचे लेझीम पथक सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथिनुसार साजरी करण्यात आलेल्या शिवजयंतीत शहरासह यावल तालुक्यातील शिवभक्त मिरवणुकीत सहभागी होते.

शिवजयंती व संपुर्ण मिरवणुकीस यशस्वी करण्यासाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचे जिल्हा उपप्रमुख गोपाळ चौधरी, तालुका उपप्रमुख शरद कोळी ,शहरप्रमुख जगदीश कवडीवाले , यावल शहर उपप्रमुख संतोष धोबी ,योगेश चौधरी ,अजहर खाटीक ,डॉ.विवेक अडकमोल, सागर देवांग, सारंग बेहडे , मयुर खर्चे ,शिवसेना प्रसिध्दी प्रमुख संतोष वाघ ,शकील पटेल यांच्यासह आदी शिवसेनिकांनी परिश्रम घेतले .

Protected Content