भुसावळ प्रतिनिधी | भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नि. तु. पाटील यांनी सेंट्रल लेबर इन्स्टीट्युटकडे केलेल्या मागण्यांची पूर्तता न झाल्यामुळे आज आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे.
याबाबत वृत्त असे की, डॉ. नि. तु. पाटील यांनी सेंट्रल लेबर इन्स्टीट्युटच्या एएफआयएच या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आहे. नियमानुसार यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारातील सुविधा उपलब्ध असणे बंधनकारक आहे. तथापि, याची सुविधा येथे उपलब्ध नाही.
या संदर्भात डॉ. नि. तु. पाटील यांनी सेंट्रल लेबर इन्स्टीट्युटकडे ई-मेल करून तक्रार करण्यात आली असली तरी याकडे दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. या अनुषंगाने आज डॉ. नि. तु. पाटील हे सेंट्रल लेबर इन्स्टीट्युटच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार आहेत.