स्वामीनारायण देवस्थानाचे कोठारी शास्त्री भक्ती किशोर दासजी यांना देवाज्ञा

सावदा तालुका रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी| येथील स्वामीनारायण देवस्थानाचे प्रमुख कोठारी शास्त्री भक्ती किशोर दासजी यांना आज देवाज्ञा झाली असून यामुळे परिसरात शोकाकुल वातावरण निर्मित झाले आहे.
यासंदर्भात मिळालेली माहिती अशी की सावदा येथील स्वामीनारायण गुरुकुलाचे प्रमुख कोठारी शास्त्री किशोरदासजी (वय ४५ ) यांची प्रकृती ढासळल्यामुळे त्यांना भुसावळ येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. येथेच आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
शास्त्रीजी यांनी याआधी सावदा येथील गुरुकुलाचे प्रमुख म्हणून केलेली कामगिरी ही अतिशय लक्षणीय राहिली असून परिसरात त्यांचा मोठ्या प्रमाणात भक्त परिवार होता. त्यांच्या आकस्मिक जाण्यामुळे परिसरातून शोक संवेदना व्यक्त करण्यात येत आहे.

Protected Content