अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |शहरातील पैलाड येथील राजेंद्र सुकदेव लांडगे यांची ठाणे येथे पीएसआय म्हणून पदोन्नती झाल्याबद्दल धनगर समाजाच्या विविध संघटनेमार्फत सत्कार करण्यात आला.
राजेंद्र लांडगे यांची पीएसआय पदी पदोन्नती झाल्याबद्दल अंमळनेर येथील राजे मल्हारराव होळकर प्रतिष्ठान, मौर्य क्रांती संघ, युवा मल्हार सेना, कर्मचारी संघटना व धनगर समाज बांधव यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी राजे मल्हारराव होळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष अण्णासाहेब बन्सीलाल भागवत, धनगर समाजाचे जेष्ठ नेते आबासाहेब हरचंद लांडगे, मौर्य क्रांती संघाचे अध्यक्ष रमेशदेव शिरसाठ, राजे मल्हारराव होळकर प्रतिष्ठानचे सचिव एस. सी. तेले, राजे मल्हार होळकर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष डी.ए. धनगर, युवा मल्हार सेनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख देवाभाऊ लांडगे, प्रतिष्ठानचे संघटक प्रभाकर लांडगे, उपसरपंच निंभोरा आलेश धनगर, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शशिकांत आढावे सर, संतोष लांडगे, गणेश शिरसाठ, समाधान धनगर, कपिल शेटे, नितीन भिल व समाज बांधव उपस्थित होते.