बोदवड प्रतिनिधी । तालुक्यातील येवती येथे जागेच्या वादातून बखळ जागेवरील लोखंडी जाळीचे कंपाऊंडचे नुकसान केल्याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात दोन जणांविरूध्द तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कल्पना प्रल्हाद पाटील (वय-४५) रा. येवती ता.बोदवड ह.मु. सुरत (गुजरात) यांचे येवती गावात घर आहे. घराच्याबाजूला त्यांच्या मालकीचे बखळ रिकामा प्लॉट आहे. रिकाम्या प्लॉटला त्यांनी लोखंडी तारेचे कंपाऊंड लावले. त्यानंतर ते नाचनखेडा ता. यावल येथे नातेवाईकांकडे निघून गेले. दरम्यान त्यांच्या घराच्या बाजूला राहणारे राजेंद्र बाळू पाटील आणि रखमाबाई बाळू पाटील दोन्ही रा. येवती यांनी लोखंडी लावलेले कम्पाऊंडे तोडून १० हजार रूपयांचे नुकसान केले आहे. जागेवरून जूना वाद असल्याच्या कारणावरून हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. कल्पना पाटील यांनी दोघांविरूध्द बोदवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास बोदवड पोलीस कर्मचारी करीत आहे.