यावल ग्रामीण रुग्णालयात ५० ऑक्सिजन बेड उपलब्ध करून द्या : आ. भोळे यांची मागणी

 

जळगाव, प्रतिनिधी । यावल ग्रामीण रुग्णालयात ५० ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्याची मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे यांनी जिल्हाधिकारी व जिल्हाशल्य चिकित्सक यांना पत्र देवून केली आहे.

निवेदनाचा आशय असा की, जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येने जास्त प्रमाणात वाढत असून पुढील दिवसात वाढत जाणाऱ्या रुग्णसंख्येला वैद्यकीय उपचार मिळण्यास खूपच दिरंगाई होत आहे. जिल्ह्यातील यावल तालुका येथे कोविड रुग्णांची संख्या वाढत असून तेथे ऑक्सिजन सुविधा पुरेश्या प्रमाणात नसल्याने तेथील नागरिकांना उपचार घेण्यास त्रास होत असून त्यांची उपचार घेण्यासाठी इतर शहरांमध्ये धावपळ होत आहे. यावल येथील ग्रामिण रुग्णालयात ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध करून देणे बाबत किंवा अन्य शासकीय जागेत ५० बेडचे ऑक्सिजन सुविधे सह कोविड सेंटर त्वरित सुरु करावे अशी मागणी यावल तालुक्यातील नागरिकांनी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजुमामा भोळे यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केलेली होती. या निवेदनाचा पाठपुरावा करून आ.भोळे यांनी जिल्हाधिकारी व जिल्हाशल्य चिकित्सक यांना सदर मागणीचे निवेदन देऊन लवकरात लवकर यावल येथे ५० बेडचे ऑक्सिजन सुविधा असलेले कोविड सेंटर सुरु करण्याबाबत विनंती केली असल्याचे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख मनोज भांडारकर यांनी कळविले आहे.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.