मलकापूर येथे एसटी कर्मचाऱ्यांचे भीक मांगो आंदोलन

बुलडाणा प्रतिनिधी । गेल्या तीन महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्‍यांनी एसटीचे शासकीय विलीनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. या तीन महिन्याच्या काळात ८० एसटी कर्मचारी शहीद झाले आहे. त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असल्याने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मलकापूर आगारातील संपकरी एसटी कर्मचाऱ्‍यांनी मलकापूर शहरात भीक मांगो आंदोलन केले.

एसटी कर्मचाऱ्यांनी मलकापूर शहरातील मुख्य मार्गावरील बस स्थानक चौकात जाऊन सरकार विरोधात घोषणाबाजी करत कर्मचाऱयांनी भीक मागितली व महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध व्यक्त केला.जोपर्यंत शासनात एसटीचे विलीनीकरण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा संपकरी एसटी कर्मचाऱयांनी दिला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून या  एसटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद संप सुरू आहे  गेल्या तीन महिन्यांपासून  या संपकरी कर्मचाऱ्यांचे पगार ही होत नसल्याने   यांच्या परिवारावर सुद्धा उपासमारीची वेळ आली आहे, आमच्या मागण्या तात्काळ राज्य सरकारने पूर्ण कराव्यात अशी मागणी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांकडून आज प्रजासत्ताक दिनी करण्यात आली आहे.

 

Protected Content