यावल तालुक्यात ‘कोविडशिल्ड’ लसीकरणास उत्तम प्रतिसाद

 

यावल,प्रतिनिधी । तालुक्यात कोरोना संसर्गपासून बचाव करणारी ‘कोविडशिल्ड’ लस आरोग्य कर्मचारी, महसुल प्रशासन, पोलीस प्रशासन, पंचायत समिती विभाग, शहरातील व्यापारी, खाजगी डॉक्टर्स यांच्यासह विविध विभागाच्या कर्मचारी आणि अधिकारी यांना पहिल्या टप्प्यात देण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यात काही लोकप्रतिनिधी यांचे देखील लसीकरण करण्यात येत आहे. 

आरोग्य यंत्रणेकडून जिल्हा परिषदचे गटनेते प्रभाकर अप्पा सोनवणे, जिल्हा बँकेचे माजी संचालक तथा जिल्हा परिषद सदस्य आर. जी. नाना पाटील , माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष शशांक देशपांडे , भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष डॉ. नरेन्द्र कोल्हे,  महसुलचे निवासी नायब तहसीलदार आर. के. पवार , नायब तहसीलदार आर. डी. पाटील , रवीन्द्र माळी , सुयोग्य पाटील, मुक्तार तडवी, दिपक बाविस्कर, दिपक भुतेकर, राजेश भंगाळे, रविंद्र मिस्त्रि यांच्यासह तालुक्यातील मान्यवरांनी या लसीकरणाच्या मोहिमेत आपला सहभाग नोंदवुन लसीकरण करून घेतले आहे.  ही लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. बी. बारेला यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व आरोग्य कर्मचारी हे कामकाज पाहत आहेत. 

 

 

Protected Content