चाळीसगावात पोलिसांची आरोग्य तपासणी

चाळीसगाव प्रतिनिधी । शहरातील पोलीस कवायत मैदानावर आयएमए संघटनेतर्फे पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांची तपासणी करण्यात आली.

चाळीसगाव शहर पोलीस कवायत मैदानावर कोरोना संसर्ग रोगाचे अनुषंगाने चाळीसगाव शहर पोस्टे, मेहुणबारे पोस्टे, चाळीसगाव ग्रामीण पोस्टे, चाळीसगाव शहर वाहतुक शाखेतील अधिकारी व कर्मचारी तसेच विशेष पोलीस अधिकारी अशासह २०० अधिकारी व कर्मचारी यांची आयएमएतर्फे तपासणी करण्यात आली. आयएमएच्या अध्यक्षा डॉक्टर स्मिता मुंदडा यांच्यासह डॉक्टर सी.टी पवार, शिरीष पवार, विनय पाटील, लीना पाटील,अजय वाबळे, नितीन पवाणी, नरेंद्र राजपूत, रणजीत राजपूत, सौरभ हरकडी, तण्वी पाटील, किरण मगर, सत्यजित पूर्णपात्रे, हरीश राजानी, मंदार करमबलकर, अनिकेत पवार, स्वप्नील पाटील, मंगेश वाडेकर, राहुल पाटील, अश्‍विनी पगारे, आशिष सोनवणे यांनी ही तपासणी केली.

याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी चाळीसगाव भाग चाळीसगाव कैलास गावडे, पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे चाळीसगाव ग्रामीण, सपोनिसचिन बेंद्रे मेहुणबारे पोस्टे, सपोनि रावसाहेब कीर्तीकर अशासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content